विराट कोहलीच्या आधी या 5 जनांसोबत रिलेशनशिप मध्ये होती अभिनेत्री अनुष्का शर्मा…

विराट कोहलीच्या आधी या 5 जनांसोबत रिलेशनशिप मध्ये होती अभिनेत्री अनुष्का शर्मा…

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली हे देशातील सर्वात सुंदर जोडप्यांपैकी एक आहेत. दोघेही वेगवेगळ्या क्षेत्रातले असून एकमेकांवर खूप प्रेम करतात. मात्र, विराट कोहलीसोबत लग्न करण्यापूर्वी अनुष्का शर्माचे हृदय अनेकांसाठी धडधडत होते.

रणवीर सिंग
अनुष्का शर्माचे नाव अभिनेता रणवीर सिंगसोबत जोडले गेले होते. दोघांनी ‘बँड बाजा बारात’ मधून पदार्पण केले. येथूनच दोघांमध्ये प्रेमाची ठिणगी पेटली, मात्र आगीचे रूप धारण करण्यापूर्वीच काही वादामुळे त्यांच्यातील नाते तुटले आणि दोघेही वेगळे झाले.

सुरेश रैना
विराटच नाही तर अनुष्का शर्माचे मन आणखी एक क्रिकेटपटू सुरेश रैनावरही आले होते. सुरेश रैना आणि अनुष्का यांची पहिली भेट लंडनमध्ये झाली होती. मात्र, दोघांनीही आपण रिलेशनशिपमध्ये असल्याचे कधीच मान्य केले नाही.

रणबीर कपूर
चॉकलेट बॉय रणबीर कपूरसोबतही अनुष्का शर्माचे नाव जोडले गेले होते. दोघांची पहिली भेट करण जोहरच्या एका पार्टीत झाली होती. त्यानंतर दोघेही अनेकदा एकत्र दिसले. मात्र, दोघांनीही ही गोष्ट कधीच जाहीरपणे स्वीकारली नाही. दोघांनी ‘बॉम्बे वेल्वेट’ आणि ‘ए दिल है मुश्किल’ सारख्या चित्रपटात एकत्र काम केले होते.

शाहिद कपूर
एक काळ असा होता जेव्हा शाहिद कपूर आणि अनुष्का शर्मा यांच्यातील नातं लोकांच्या ओठावर होतं. बदमाश कंपनी या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघे एकमेकांच्या जवळ आले होते. इम्रान खानच्या ‘मेरे ब्रदर की दुल्हन’ या चित्रपटाच्या सक्सेस पार्टीमध्ये शाहिद आणि अनुष्काचा किसिंग सीन कॅमेऱ्यात कैद झाल्याचेही वृत्त आहे. मात्र, हे नाते फार काळ टिकले नाही.

अर्जुन कपूर
बोनी कपूरचा मुलगा अभिनेता अर्जुन कपूरसोबत अनुष्का शर्माचे नाव जोडले गेले होते. यशराज फिल्म्सच्या स्टुडिओमध्ये दोघे अनेकदा एकत्र दिसले. मात्र, दोघांनीही हे सत्य कधीच उघडपणे मान्य केले नाही.

विराट कोहली
एका शॅम्पूच्या जाहिरातीदरम्यान अनुष्का शर्मा आणि विराट कोहली जवळ आले. यानंतर दोघे प्रेमात पडले आणि 2017 मध्ये दोघांनी लग्न केले. दोघांना वामिका नावाची मुलगी आहे.

admin