मनमोहन देसाई यांना पेपर वाचताना सुचली “अमर अकबर अँथनी” बनवण्याची कल्पना, जाणून घ्या ही रंजक कहाणी

मनमोहन देसाई यांना पेपर वाचताना सुचली “अमर अकबर अँथनी” बनवण्याची कल्पना, जाणून घ्या ही रंजक कहाणी

27 मे 1977 रोजी मल्टीस्टारर चित्रपट प्रदर्शित झाला जो बॉक्स ऑफिसवर कमालीचा होता. अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, विनोद खन्ना, परवीन बाबी, नीतू कपूर आणि शबाना आझमी यांच्या ह्या अजरामर चित्रपटाचे नाव ‘अमर अकबर अँथनी’ होते. या चित्रपटात प्राण आणि निरुपा रॉय सारख्या कलाकारांचीही भूमिका होती. हा चित्रपट पडद्यावर जबरदस्त हिट ठरला. तथापि, हा चित्रपट बनविण्यामागची कहाणी खूप रंजक आहे.

ही गोष्ट 1975 ची आहे जेव्हा मनमोहन देसाई हे दररोजप्रमाणे वर्तमानपत्र वाचत बसले होते. त्या वर्तमानपत्रात एक बातमी प्रसिद्ध झाली होती जी वाचून मनमोहन देसाई आश्चर्यचकित झाले. एका व्यक्तीने आपल्या 3 मुलांबरोबर पार्कमध्ये येऊन मुलांना तेथेच सोडून गेल्याचं वृत्त होतं. दिवसभर मनमोहन देसाईंच्या मनात ही बातमी सतत चालू राहिली.

संध्याकाळी जेव्हा ते लेखक प्रयाग राज यांना भेटले तेव्हा त्यांनी त्या वृत्ताचा संदर्भ दिला आणि ते म्हणाले की, ‘जर तो व्यक्ती स्वतः ची चूक सुधारून पुन्हा त्या पार्क मध्ये गेला असता आणि त्याला त्याची मुलं तिथे सापडली नसती तर??’ पुढे, त्या तीन मुलांना वेगवेगळ्या, हिं दूं नी, मु स्लि मां नी आणि ख्रि श्च नां नी नेले तर काय होईल?

मनमोहन देसाई आणि प्रयाग राज यांच्या चर्चा हळूहळू एक कथा तयार करत होती. दुसर्‍या दिवशी दोघांची पुन्हा भेट झाली आणि यावेळी मनमोहन यांची पत्नी जीवन प्रभा देखील त्यांच्यासोबत होती.

हळू हळू गोष्टी सुरु झाल्या आणि तिघांनी एकत्र येऊन एक आश्चर्यकारक कथा तयार केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मितीही मनमोहन देसाई यांनी केली होती. चित्रपटाची कथा प्रयाग राज, कादर खान आणि केके शुक्ला यांनी लिहिली होती.

केवळ बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला जबरदस्त यश मिळालं नाही, तर सर्वांनासुद्धा आवडलं. चित्रपटाच्या गाण्यांपासून ते संवादापर्यंत सर्व काही सुपरहिट ठरले. टीव्हीवर बरीच वर्षे लोटल्यानंतरही हा चित्रपट खूपच पसंत आहे

admin