बॉलिवूड पुन्हा हादरले, सिद्धार्थ शुक्ल नंतर आता या प्रसिद्ध अभिनेत्याच्या….

बॉलिवूड पुन्हा हादरले, सिद्धार्थ शुक्ल नंतर आता या प्रसिद्ध अभिनेत्याच्या….

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या आई अरुणा भाटिया याचं निधन झालंय. अक्षय कुमारने स्वत: एक ट्वीट करत ही दुःखद बातमी दिली आहे. गेल्या दोन दिवसांपासून प्रकृती बिघडल्याने अरुणा भाटिया यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.

अखेर 8 सप्टेंबर बुधवारी सकाळी अरुणा भाटिया यांनी अखेरचा श्वास घेतला. अक्षय कुमारच्या आईच्या निधनानंतर बॉलिवूडमधूनही दु:ख व्यक्त केलं जातं आहे.

अक्षय कुमारने आईच्या निधनानंतर एक भावूक ट्वीट केलं आहे. यात तो म्हणाला, “ती माझा गाभा होती आणि आज मला तिच्या जाण्याने अंतःकरणात असह्य वेदना होत आहेत.

माझी आई श्रीमती अरुणा भाटिया यांनी आज जगाचा निरोप घेतला आहे आणि ती माझ्या वडिलांकडे दुसऱ्या जगात गेली आहे. या कठीण काळात माझ्या कुटुंबासाठी तुम्ही केलेल्या प्रार्थनांना आदर करतो. ओम शांती” अशा आशयाचं ट्वीट अक्षयने केलंय.

आपल्या मुलाच्या 54 व्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी अरुणा भाटियाने अखेरचा श्वास घेतला.अक्षय कुमारचा वाढदिवस 9 सप्टेंबरला येतो.अक्षयने ट्विटमध्ये लिहिले- माझी आई माझा कणा होती. मला आज माझ्या मनात असे दुःख वाटत आहे, जे मी सहन करू शकत नाही.

admin