प्रसिद्ध अभिनेत्रीवर लाईव्ह शोदरम्यान दगडफेक

प्रसिद्ध अभिनेत्रीवर लाईव्ह शोदरम्यान दगडफेक

एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत धक्कादायक घटना घडली आहे. लाईव्ह शो दरम्यान परफॉर्म करत असताना प्रसिद्ध अभिनेत्रीवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर लगेचच तिला स्टेज सोडावा लागला होता. तसेच पोलिसांच्या सुरक्षेत तिला घटनास्थळावरून बाहेर काढण्यात आले आहे. या घटनेने प्रसिद्ध अभिनेत्रीला मोठा धक्का बसला आहे.

भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध स्टार अक्षरा सिंगवर लाईव्ह शो दरम्यान दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. एका लाईव्ह शोमध्ये ही घटना घ़डली आहे. अक्षरा सिंह जौनपूरमधील बदलापूर महोत्सवात परफॉर्म करत होती. त्यावेळी तिच्यासोबत ही दगडफेकीची घटना घडली होती. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

व्हिडिओत काय?

व्हिडिओत अक्षरा सिंग एका लाईव्ह शोमध्ये परफॉर्म करताना दिसत आहे. तिचा हा परफॉर्म सुरु असताना काही लोकांनी तिच्यावर दगडफेक केली. या दगडफेकीमुळे तिला स्टेज सोडावा लागला होता. यानंतर हा गोंधळ इतका वाढला की अभिनेत्रीला पोलिस संरक्षणात घटनास्थळावरून बाहेर काढण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

अक्षरा सिंहने इंस्टाग्रामवर बदलापूर महोत्सवाच्या हॅशटॅगसह एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती एका सुंदर लाल ड्रेसमध्ये स्टेजवर दिसत आहे. यादरम्यान हजारो प्रेक्षक हा कार्यक्रम पाहण्यासाठी उपस्थित होते. या व्हिडीओसोबत अक्षराने लिहिले की, “मला भ्रम झाला नाही, पण काय करू, त्यावर तुमचे प्रेम वाया घालवणे आश्चर्यकारक होते. तुम्हा सर्वांना भेटून मजा आली, असे तिने म्हटले आहे.

दरम्यान या घटनेनंतर अनेकांनी अक्षरावर दगडफेक करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. आता त्यांच्यावर काय कारवाई होते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

admin