अजय देवगन विवाहित असूनही त्याच्या प्रेमात पार वेडी झाली होती ही अभिनेत्री ? इतक्या वर्षांनी केला खुलासा..

अजय देवगन विवाहित असूनही त्याच्या प्रेमात पार वेडी झाली होती ही अभिनेत्री ? इतक्या वर्षांनी केला खुलासा..

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये बऱ्याचदा असे पाहिले गेले आहे की प्रत्येक वेळी कोणी ना कोणी आपल्या प्रेमसंबंधांमुळे चर्चेचा भाग बनलेला असतो असतो. आणि जर बॉलिवूड मधील च दोन कलाकार एकमेकांच्या प्रेमात पडले असतील तर अशा वेळी ते बातमीपत्रात थेट हेडलाईन गाठतात.अशा परिस्थितीत चित्रपटातील कलाकारांमधील नात्यांची चर्चा नेहमीच होत असते.

आताच्या काळात जरी अशा घटना कमी झाल्या असतील तरी 1990 च्या दशकात मात्र अशे प्रकरण सर्रास समोर येत असत. असे अनेक कलाकारांचे जोडपे एकमेकांच्या प्रेमात होते ज्यांनी तेव्हा जगासमोर मान्य नाही केलं.. परंतु आता काही वर्षांनी हे प्रकरण उघडकीस येत आहेत.

आज आम्ही तुम्हाला 90 च्या दशकातील अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिने नुकताच एक असा किस्सा सांगितलं आहे ज्यातून तिच्या तेव्हा सुरू असलेल्या प्रेम प्रकरणाचे रहस्य उलगडले आहे. आणि ज्या व्यक्तीवर त्या अभिनेत्रीचे प्रेम जडले होते अशी चर्चा होती, तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून बॉलिवूडचा सिंघम अजय देवगन आहे.

दिग्दर्शक सुभाष घई यांच्या ‘परदेस’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी महिमा चौधरी एकेकाळची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री मानली जायची. यशाच्या शिखरावर पोहचल्यानंतर कलाकारांबाबत अफवा पसरणं किंवा एखाद्या अभिनेत्यासोबत नावं जोडलं जाणं काही नवीन गोष्ट नाही. पण त्यावेळी अभिनेता अजय देवगण आणि महिमा चौधरी यांच्यात प्रेम प्रकरण सुरू असल्याच्या बातम्यांनी बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घातला होता.

पण त्यावेळी अभिनेता अजय देवगण आणि महिमा चौधरी यांच्यात प्रेम प्रकरण सुरू असल्याच्या बातम्यांनी बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घातला होता. विशेष म्हणजे त्यावेळी अजय देवगनचं नुकतचं लग्न झालं होतं. आता याबाबत महिमाने स्वतः खुलासा केला आहे.

अलीकडेच महिमा चौधरीनं पिंकविला या वेब पोर्टलाला मुलाखत दिली आहे. यावेळी तिने अजय देवगणसोबत नाव जोडल्याबाबत मोठा खुलासा केला आहे. अजय देवगणसोबत प्रेमसंबंधाची चर्चा निव्वळ अफवा असल्याचं तिनं सांगितलं आहे. इतक्या वर्षांनी तिने या गोष्टीचा उलगडा केला.

यावेळी तिने या ‘दिल क्या करे’ या चित्रपटाच्या शुटींग दरम्यानचा एक किस्साही सांगितला आहे. ‘दिल क्या करे’ या चित्रपटात अजय देवगण आणि काजोलनं मुख्य भूमिका साकारली आहे. पण या चित्रपटात महिमानं एक छोटीशी भूमिका साकारली होती. आणि त्याच चित्रपटानंतर दोघांच्या संबंधांची चर्चा होऊ लागली.

या चित्रीकरणाच्या वेळी महिमानं दिग्दर्शकाला सांगितलं होतं की, क्लोज अप शॉट घेवू नको. कारण या चित्रपटाच्या शुटींगपूर्वी महिमा चौधरीचा एक अपघात झाला होता. या अपघातात तिच्या चेहऱ्यावर अनेक ठिकाणी काचा घुसल्यानं जखमा झाल्या होत्या. या अपघातामुळं ती बराच काळ चित्रपटापासून दूर राहिली होती.

महिमानं सांगितल्यानंतरही दिग्दर्शकानं महिमाचे क्लोज अप शॉट घेतले. ही बाब महिमाला समजल्यानंतर ती दिग्दर्शकावर चिडलीयानंतर महिमा चौधरीची अस्वस्थता पाहता, अजय देवगणने तिला विचारलं तिला कारण विचारलं. यावेळी तिने क्लोज शॉटबाबत घडलेला किस्सा अजयला सांगितला. अजयला तिची काळजी वाटली.

त्यामुळे त्यानेही महिमाची बाजू घेत, क्लोज अप शॉट न घेण्याची विनंती दिग्दर्शकाला केली. यानंतर दिग्दर्शकानं सगळ्यांना सांगायला सुरुवात केली की, अजय देवगन महिमावर प्रेम करतो. दुसऱ्या दिवशी ही बाब सगळीकडे पसरली होती.

admin