आजपर्यंत अभिषेकने ऐश्वर्याची पूर्ण केली नाही एक ईच्छा, वारंवार करतो दुर्लक्ष

आजपर्यंत अभिषेकने ऐश्वर्याची पूर्ण केली नाही एक ईच्छा, वारंवार करतो दुर्लक्ष

एकीकडे ऐशनं सलमानशी नातं तोंडलं. विवेकशी प्रेमाच्या चर्चा सुरु होत्या. त्याचवेळी ‘ढाई अक्षर प्रेम’ के म्हणत तिनं ज्युनियर बी अभिषेक बच्चनला क्लीनबोल्ड केलं. ‘कुछ ना कहो’ आणि ‘धूम-2’च्या सेटवर तर लव्हस्टोरी सुरु होती.

ऐश्वर्या राय आणि अभिषेकसाठी 2007 हे वर्ष थोडं खास होतं. कारण जानेवारी महिन्यात दोघांची प्रमुख भूमिका असलेला ‘गुरु’ रुपेरी पडद्यावर झळकला. रिलीजनंतर अवघ्या दोन दिवसांनी दोघांची एन्गेजमेंटही झाली.

‘गुरु’च्या सुपरडुपर यशानंतर ऐश-अभि 20 एप्रिल 2007 रोजी रेशीमगाठीत अडकले. उत्तर भारतीय आणि बंगाली पद्धतीने दोघांचं शुभमंगल पार पडलं आणि ऐश्वर्या राय बनली ऐश्वर्या राय बच्चन.

दोघांचाही सुखी संसार सुरु आहे. अभि-ऐशच्या आयुष्यात आराध्यामुळे आणखीच आनंदमय झाले आहे.दोघांच्या लग्नाला आता १४ वर्ष झाली आहेत. मात्र आजपर्यंत अभिषेकने ऐश्वर्याची एक ईच्छा कधीच पूर्ण केली नाही.

अभिषेकने आलीशान अपार्टमेंट २०१५ मध्ये खरेदी केले होते, परंतु,अभिनषेकला त्या घरात राहायला जायचे नाही. ऐश्वर्याला मात्र त्या घरात राहण्याची ईच्छा असूनही अभिषेकने या गोष्टीकडे नेहमीच दुर्लक्षच केले.

ऐश्वर्याने अनेकदा याच गोष्टीला घेवून हट्टही केला मात्र अभिषेकने यावर नकारच दिला. अभिषेक सध्यातरी आपल्या पालकांबरोबर राहण्याची त्याची ईच्छा आहे.

काही काळापूर्वी ही जोडीने वेगळे राहाण्यासाठी मुंबईच्या बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये ५५०० स्क्वेयर फीटचे एक आलीशान अपार्टमेंट खरेदी केले होते. या नवीन फ्लॅटची किंमत २१ करोड रुपयांपेक्षा जास्त आहे.

नवीन घरात जर ऐश्वर्या राहायला आली तर त्यांची शेजारी सोनम कपूर असेल. सोनमने सुद्धहा याच बिल्डिंगमध्ये घर खरेदी केले आहे, जे ७००० स्क्वेयर फीट वर बनवलेले आहे. त्याची किंमत ३५ करोड पेक्षा जास्त आहे.

admin