ह्या हॉट अभिनेत्रीला स्वतःच्याच कामाची वाटतेय लाज,वडिलांना सांगितले “माझ्यासमोर ही वेबसिरीज बघू नका” !

ह्या हॉट अभिनेत्रीला स्वतःच्याच कामाची वाटतेय लाज,वडिलांना सांगितले “माझ्यासमोर ही वेबसिरीज बघू नका” !

अभिनेत्री स्वरा भास्कर हिने आपल्या अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. चौकटीबाहेरच्या भूमिकांना तितक्याच ताकदीने न्याय देणारी अभिनेत्री अशी तिची ओळख निर्माण झाली आहे. वीरे दी वेडिंग, नील बटे सन्नाटा, रांझणा अशा विविध हिंदी सिनेमात स्वराने दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत.

रूपेरी पडदा गाजवल्यानंतर स्वरा आता वेबसिरीजकडे वळली आहे. ‘रसभरी’ ही स्वराची नवीन वेब सीरिज रसिकांच्या भेटीला येत आहे. या सीरिजमध्ये स्वराने शिक्षिकेची भूमिका साकारली आहे. शिक्षिका आणि विद्यार्थी यांच्या अवतीभवती सीरिजची कथा फिरते. विशिष्ट वयोगटात तरुणांच्या मनात स्त्रियांविषयी येणाऱ्या विचारांवर उपहासात्मक पद्धतीने यात भाष्य करण्यात आलं आहे. निखिल भट्टने याचे दिग्दर्शन केले आहे.

स्वराला बॉलिवूडमध्ये काम करताना पाहून नक्कीच तिच्या वडिलांचा ऊर अभिमानाने भरून येतो. स्वराबाब नेहमीच वडिलांना अभिमानस्पद वाटते. म्हणून नवीन भूमिकेत आपली लेक रसिकांच्या भेटीला येणार म्हणून तिला शुभेच्छा देण्यासाठी ट्विट केले.

तर स्वराने वडिलांचे ट्विट वाचून रिप्लाय केला की, ‘डॅडी, कृपया मी समोर असताना ही वेब सीरिज पाहू नका.’ स्वराच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनीही खूप कमेंट्स केल्या आहेत.

admin