तर ऐश्वर्याचा नाही, करिश्मा कपूरचा असता अभिषेक बच्चन, या ‘अटी’मुळे मोडला साखरपुडा

तर ऐश्वर्याचा नाही, करिश्मा कपूरचा असता अभिषेक बच्चन, या ‘अटी’मुळे मोडला साखरपुडा

खरे तर ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची लव्हस्टोरी बरीच इंटरेस्टिंग आहे. पण ऐश्वर्या हे अभिषेकचे पहिले प्रेम नव्हते. ऐश्वर्याच्या आधीसुद्धा अभिषेकच्या आयुष्यात अनेक महिला आल्या होत्या.अभिषेकच्या आयुष्यातील सर्वात पहिली महिला कोण होती, तर करिश्मा कपूर. या दोघांची लव्ह स्टोरी कुणापासूनही लपून राहिलेली नाही.

या दोघांचा साखरपुडाही झाला होता, असेही म्हटले जाते. करिश्मा व अभिषेक परस्परांना लहानपणापासून ओळखत होते. अभिषेकची मोठी बहीण श्वेता हिच्या लग्नात अभि व करिश्मा जरा जास्तच जवळ आलेत. अभिषेक बच्चन याचा (5 फेब्रुवारी) वाढदिवस असतो. ज्युनिअर बच्चनच्या वाढदिवसानिमित्त त्याच्याच आयुष्यातील काही खास गोष्टी…खास तुमच्यासाठी…

अभिषेकच्या पहिल्या चित्रपटात करिश्माची लहान बहीण करिना हिरोईन होती. करिना अभिषेकला जीजू म्हणूनच हाक मारायची. अमिताभ यांनी आपल्या 60 व्या वाढदिवशी करिश्मा व अभिषेक यांच्या साखरपुड्याची घोषणा केली आणि सगळ्या जगापुढे या नात्याचा खुलासा झाला. पण यानंतर काही असे झाले की, हे लग्न मोडले.

करिश्माची आई बबीता हिला अभिषेक फारसा आवडत नव्हता. या काळात अभिषेकचे सगळे चित्रपट फ्लॉप गेलेत. याऊलट करिश्मा त्याकाळातील सुपरहिट हिरोईन होती. अभिषेक अपयशी ठरला तर काय, याची बबीता यांना भीती होती.

असे म्हणतात की, करिश्माची आई बबीताने करिश्मा व अभिषेकच्या लग्नाआधी एक अट ठेवली होती. पती रणधीर कपूर यांच्यापासून वेगळे झाल्यानंतर बबीता यांनी करिश्मा व करिना या मुलींना एकटीने वाढवले होते. त्यामुळे पैशाचे महत्त्व त्यांना माहित होते. आपल्या मुलींना कधीच पैशाची कमतरता भासू नये, असे त्यांना वाटत होते.

अभिषेकला करिश्मा डेट करत असताना बच्चन कुटुंब काहीसे आर्थिक संकटात सापडले होते. कर्जाचा डोंगरही होता. अशात करिश्माचे भविष्य सुरक्षित असावे, अशी बबीतांची इच्छा होती. त्यामुळे अमिताभ यांनी आपल्या संपत्तीचा काही भाग अभिषेकच्या नावावर करावा, जेणेकरून करिश्माचे भावी आयुष्य सुरक्षित राहील, अशी अट बबीतांनी ठेवली होती. बच्चन कुटुंबाने ही अट नाकारली आणि त्यामुळे करिश्मा व अभिषेकचा साखरपुडा मोडला होता.

करिश्मासोबत साखरपुडा तुटल्यानंतर अभिषेकचे मन राणी मुखर्जीवर आले. मणिरत्नम यांच्या ‘युवा’ या चित्रपटादरम्यान दोघांमधील जवळीक वाढली. दोघांचीही ऑन आणि ऑफ केमिस्ट्री लोकांना चांगलीच भावली. पण यावेळी अभिषेकची आई जया बच्चन यांनी राणीला विरोध केला. आईने अभिषेकला राणीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आणि त्याचमुळे राणी बच्चन कुटुंबाची सून बनता बनता राहिली.

यानंतर अभिषेकच्या आयुष्यात ऐश्वर्या आली. अभिषेक व ऐश्वर्याने बरेच चित्रपट एकत्र केले होते. पण त्याकाळात ऐश्वर्याच्या आयुष्यात सलमान खान आणि नंतर विवेक ओबरॉय होते. पण या दोघांशीही ऐश्वर्याचे ब्रेकअप झाले. यानंतर ‘गुरु’ या चित्रपटाच्या सेटवर अभिषेक आणि ऐश्वर्या जवळ आलेत. ‘गुरु’च्या सक्सेस पार्टीदरम्यान अभिषेकने ऐश्वर्याला प्रपोज केले. यानंतर एप्रिल 2007 मध्ये दोघांचे लग्न झाले.

admin