‘या’ लोकप्रिय गायिकेला गरोदरपणाचे फोटो शेअर न केल्याचा पश्चाताप

‘या’ लोकप्रिय गायिकेला गरोदरपणाचे फोटो शेअर न केल्याचा पश्चाताप

मनोरंजन इंडस्ट्रीतील सगळेच स्टार्स त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्याबद्दलही खूप चर्चेत असतात. कधी ते त्यांच्या लव्ह लाईफबद्दल तर कधी वैवाहिक आयुष्याबद्दल तर कधी पालक होण्याबद्दल चर्चेत राहतात. गेल्या काही महिन्यांपासून साऊथची सुप्रसिद्ध गायिका चिन्मयी श्रीपाद आई होण्यामुळे चर्चेत आहे.

चिन्मयी या वर्षी जूनमध्ये दोन जुळ्या मुलांची आई झाली आहे. त्याचबरोबर, तिने सोशल मीडियावर आपल्या मुलांचे फोटो शेअर करून ही आनंदाची बातमी लोकांसोबत शेअर करताच अनेकांनी तिचे अभिनंदन केलं आणि अनेकांनी तिला प्रचंड ट्रोलही केलं आहे. ट्रोलर्सचं म्हणणं आहे की, चिन्मयी सरोगसीद्वारे आई बनली, कारण तिने गरोदरपणात बेबी बंप दाखवणारा एकही फोटो शेअर केला नाही. त्याचवेळी चिन्मयीने एक फोटो आणि व्हिडिओ शेअर करून तिच्या प्रेग्नेंसीचा पुरावा दिला आहे.

चिन्मयीने हा फोटो शेअर केला आहे

चिन्मयी श्रीपादाने नुकताच इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती तिचा बेबी बंप दाखवताना दिसत आहे. हा फोटो तिच्या गरोदरपणाच्या 32 व्या आठवड्यात काढला आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिलं आहे की, ‘मी गरोदरपणात क्लिक केलेला हा एकमेव फोटो आहे. जवळपास ३२ वा आठवडा आहे.

चिन्मयीला पश्चाताप होतो

हा फोटो शेअर केल्यानंतर चिन्मयीने एक व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती म्हणाली, ”मी आता माझ्या गर्भधारणेच्या 32 व्या आठवड्यात एक फोटो शेअर केला आहे कारण आता मला थोडा पश्चाताप होत आहे की मी गरोदरपणात जास्त फोटो का काढले नाहीत. आणि मी माझ्या YouTube व्हिडिओंमध्ये आधीच सांगितलं आहे की, मी त्यावेळी घाबरले होते.

गेल्या वेळी गर्भपात झाल्यानंतर, यावेळी मला निरोगी गर्भधारणा हवी होती. आणि मी लोकांना माझा फोटो घेण्यास नकार दिला आणि प्रत्येकाला माझ्या गोपनीयतेची काळजी घेण्यास सांगितली. मात्र, चिन्मयी श्रीपादाने तिच्या या फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून सरोगसीच्या माध्यमातून आई झाल्याची बातमी खोडून काढली आहे.

admin