किरण रावनंतर आमिर खान आता तिसऱ्यांदा लग्न करण्यास तयार? या मुस्लिम अभिनेत्री सोबत जोडले जात आहे नाव…

किरण रावनंतर आमिर खान आता तिसऱ्यांदा लग्न करण्यास तयार? या मुस्लिम अभिनेत्री सोबत जोडले जात आहे नाव…

आमिर खानला बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट असे म्हटले जाते कारण तो नेहमीच वेळेच्या बाबतीत खूप काळजपूर्वक असतो. आमिर खान त्याच्या व्यावसायिक आयुष्यात जितका परफेक्ट आहे तितकाच त्याचे वैयक्तिक आयुष्यही गुंतागुंतीचे आहे. आमिर खानचे नाव या वर्षी चर्चेत आले जेव्हा त्याने पत्नी किरण रावसोबत घटस्फोटाची घोषणा केली.

त्याच वर्षी ऑगस्ट महिन्यात पती-पत्नी दोघांनी घटस्फोट घेतला आणि चाहत्यांना आश्चर्यचकित केले. अर्थात आमिर आणि किरण राव आता एकत्र नाहीत, पण आताही ते दोघेे चांगले मित्र म्हणून एकत्र दिसतात.

किरण रावच्या आधीही आमिर खानने एकदा लग्न केले होते. त्याच्या पत्नीचे नाव रीना दत्ता होते आणि त्यांना ईरा आणि जुनैद ही दोन मुले आहेत. रीनासोबत घटस्फोट घेतल्यानंतर डिसेंबर 2005 मध्ये त्यानेे किरणशी लग्न केले. आमिरला किरणपासून एक मुलगा आहे, त्याचे नाव आझाद आहे.

मात्र, आमिर खानच्या दोन घटस्फोट आणि दोन लग्नांचा मुद्दा होता, मात्र आता पुन्हा एकदा आमिर खान चर्चेत आला आहे. त्याचे कारण तिसरे लग्न असल्याचे सांगितले जात आहे. होय, एंटरटेनमेंट वेबसाईट बॉलीवूडलाइफच्या एका निवेदनानुसार, आमिर खान आता लवकरच तिसर्‍यांदा लग्न करण्याच्या तयारीत आहे.

आमिर खान सध्या ‘लाल सिंह चड्ढा’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे आणि चाहते त्याच्या चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘3’ इडियट’नंतर करीना कपूर पुन्हा एकदा त्याच्यासोबत या चित्रपटात दिसणार आहे. मात्र चित्रपटापेक्षा त्याच्या तिसऱ्या लग्नाचीच अधिक चर्चा होत आहे. सोशल मीडियावर त्याच्या तिसऱ्या लग्नाबाबत अफवा पसरवल्या जात असून, यावेळी कोणती अभिनेत्री आमिरसाठी हमसफर बनण्यास तयार आहे हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

ज्या अभिनेत्रीसोबत आमिर खानचे नाव सध्या सोशल मीडियावर जोडले जात आहे, ती एकेकाळी त्याची को-स्टार होती. ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून फातिमा सना शेख आहे जिचे नाव आजकाल इंटरनेटवर ट्रेंड करत आहे. असाही अंदाज लोकांकडून वर्तवला जात आहे की, आमिर खानला त्याच्या ‘दंगल’ या अभिनेत्रीच्या प्रेमाची खात्री आहे, त्यामुळेच त्याने किरण रावलाही घटस्फोट दिला आहे.

फातिमा सना शेखबद्दल सांगायचे झाले तर ती आमिर खानला आपला गुरू मानते आणि त्याच्यासोबत ‘दंगल’ आणि ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’मध्ये काम केले आहे. एका मुलाखतीदरम्यान फातिमा सनाने स्वतः खुलासा केला आहे की ती आणि आमिर चांगले मित्र आहेत पण त्यांनी एकमेकांना यापेक्षा जास्त महत्त्व कधीच दिले नाही.

अशा स्थितीत आमिर खानच्या तिसर्‍या लग्नाबाबत जी अटकळ बांधली जात आहे ती बिनबुडाची असून आमिर खानचा सध्या तिसर्‍या लग्नाचा कोणताही विचार नाही असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.

admin