ह्या पाच चित्रपटांसाठी आजही आमीर स्वतःला कोसतो.. तुम्हालाही पाहून कीव येईल..

ह्या पाच चित्रपटांसाठी आजही आमीर स्वतःला कोसतो.. तुम्हालाही पाहून कीव येईल..

आमीर सिनेमांसाठी स्वतःवरही प्रचंड मेहनत घेतो. कोणतीही भूमिका खरी वाटावी यासाठी तो स्वतः नेहमी प्रयत्नशील असतो. त्याच्या या सर्व प्रयत्नांसाठी तो सर्वांच्या कौतुकास नेहमीच पात्र असतो. आमीरने दंगल सिनेमात एका सीनसाठी स्वतःचे वजन कमी केले होते. या सिनेमातील त्याचे फॅट टू फिट असे कॅप्शन देऊन अनेक फोटो व्हायरल झाले होते.

आज मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिरने त्याच्या सुरुवातीच्या काळात काही असे सिनेमे केले जे आता जर कोणी पाहिले तर त्यांना आमिरच्या परफेक्शनिस्ट या उपाधीवर प्रश्न निर्माण होतील. खुद्द आमिर देखील या चित्रपटांबद्दल आता बोलत नसेल आणि ते सिनेमे स्वतःही नि इतरांनाही पाहू देत नसेल. तर पाहूया आमिरची असेच काही फ्लॉप सिनेमे.

तुम मेरे हो :

१९९० साली आलेला ताहीर हुसेन यांचा हा सिनेमा बघणं म्हणजे डोळ्यांवर अत्याचार करण्याचा प्रकार आहे. आमिर खान आणि जुही चावला यांची मुख्य भूमिका असणाऱ्या या सिनेमात आमिरने एका गारुड्याची भूमिका साकारली आहे. तर जुहीने त्याच्या प्रेयसीची भूमिका साकारली आहे.

मेला :

आमिर खान, ट्विंकल खन्ना, फैजल खान यांची मुख्य भूमिका असणाऱ्या हा सिनेमा धर्मेश दर्शन यांनी दिग्दर्शित केला होता. याच धर्मेश दर्शन यांनी मेला या चित्रपटाआधी ‘राजा हिंदुस्थानी’ हा ब्लॉकबस्टर सिनेमा दिला होता. मेला हा सिनेमा सुपर फ्लॉप झाला होता.

ट्विंकल खन्नाने अक्षय कुमारला सांगितले होते, की जर ‘मेला’ फ्लॉप झाला तर ती अभिनय सोडेल आणि अक्षयसोबत लग्न करेल. प्रत्यक्षात झाले देखील असेच. याच सिनेमानंतर अक्षय आणि ट्विंकल यांनी लग्न केले. हा सिनेमा फ्लॉप तर झाला, मात्र आज टीव्हीवर हा सिनेमा लागला की, त्याला चांगला प्रतिसाद मिळतो.

अव्वल नंबर :

देव आनंद यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा १९९० साली प्रदर्शित झाला होता. आमिर खान देव आनंद यांचा खूप मोठा फॅन होता. जेव्हा हा सिनेमा देव आनंद यांनी केला तेव्हा ते ६७ वर्षांचे होते.

देव आनंद या सिनेमाची स्क्रिप्ट आमिरकडे घेऊन गेले, तेव्हा आमिरने स्क्रिप्ट न वाचता या सिनेमाला होकार दिला. या सिनेमाची क्रिकेटवर आधारित आहे. आमिर खान आणि आदित्य पांचोली या दोघांमध्ये दुश्मनी असते आणि शेवटच्या सामन्याला क्रिकेट स्टेडियम उडवण्याची धमकी मिळते. अशी एकंदरीत सिनेमाची कथा आहे.

दौलत की जंग :

१९९२ साली आलेला हा सिनेमा १९६९ साली आलेल्या ‘मैकेना गोल्ड’ या हॉलिवूडपटाचा रिमेक होता. नावावरूनच या सिनेमाची कथा आपल्या लक्षात येत असेल. जूही चावला आणि आमिर खान यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा टिपिकल बॉलिवूड चित्रपट आहे. या सिनेमात परेश रावल, कादर खान, दिलीप ताहिल, टीकू तलसानिया आदी अनेक दिग्गज कलाकार दिसले होते.

आतंक ही आतंक :

दिग्दर्शक शंकर यांचा हा सिनेमा बऱ्यापैकी अमेरिकन सिनेमा ‘गॉडफादर’ वरून प्रेरित होता. या सिनेमात देखील जुही आणि आमिर यांची जोडी असलेला हा सिनेमा तीन वर्ष लटकला. जेव्हा सिनेमा शूट होऊन पूर्ण झाला तेव्हा डबिंगच्या वेळेस ओम पुरी आणि कबीर बेदी हे डबिंगला आले नाहीत.

admin