आलिया भट्टचं शाळेतील लव्हलाईफबद्दल मोठं वक्तव्य, ’10 वीत असताना एकाचा तों…’

आलिया भट्टचं शाळेतील लव्हलाईफबद्दल मोठं वक्तव्य, ’10 वीत असताना एकाचा तों…’

आलिया भट्ट बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा अभिनय आणि सौंदर्य चाहत्यांना खूप आवडतं. आलिया ही तरुण वर्गातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

2012 मध्ये रिलीज झालेल्या स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटातून तिने करिअरची सुरुवात केली. आलिया सध्या बॉलिवूडमध्ये बिग बजेट चित्रपट साइन करत आहे. काही दिवसांपूर्वी आलियाने स्वतःबद्दल व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

आलियाने 14 एप्रिल 2022 रोजी तिचा बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत लग्न केलं. लग्नापूर्वी हे दोन्ही कलाकार चार वर्षे एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. यादरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडिओही व्हायरल झाले होते.

लग्नानंतर दोन्ही कलाकार आपापल्या कामाकडे वळले. अलीकडेच आलियाचा एक व्हिडिओ यूट्यूबवर व्हायरल होत आहे. तिच्या या व्हायरल व्हिडिओमध्ये आलिया भट रिलेशनशिपबद्दल बोलताना दिसत आहे.

तिचा हा व्हिडिओ 2012 चा आहे. ‘स्टुडंट ऑफ द इयर’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलिया करण जोहरच्या शो ‘कॉफी विथ करण’मध्ये अभिनेता वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसली होती. यावेळी आलियाने सांगितलं की, आलियाचा पहिला बॉयफ्रेंड इयत्ता सहावीत असताना होता.

त्याचबरोबर तिचा पहिला अधिकृत ऑफिशियल बॉयफ्रेंड दहावीत होता. दोघंही या नात्यात खूप गंभीर होते. आलियाने त्याला २ वर्षे डेट केलं. मुलाने आलियाला सोडल्यानंतर ती खूप एकटी पडली होत. पूर्वी जेव्हा या अभिनेत्री रिलेशनशिपमध्ये होत्या तेव्हा चाहत्यांना खूप आश्चर्य वाटायचं.

नुकतीच आलिया भट्ट आणि रणबीर कपूरसोबत ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात दिसले. त्यांचा हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित झाला होता. आलिया आणि रणबीरने एकत्र स्क्रीन शेअर करण्याची ही पहिलीच वेळ होती, आणि त्यांनी ते खूप प्रभावीपणे केलं.

admin