कपिल देवने त्याची कहाणी सांगण्यासाठी घेतले तब्बल  इतके कोटी, ऐकून बसेल धक्का…

कपिल देवने त्याची कहाणी सांगण्यासाठी घेतले तब्बल  इतके कोटी, ऐकून बसेल धक्का…

भारतीय क्रिकेट संघाने 38 वर्षांपूर्वी 1983 मध्ये पहिला विश्वचषक जिंकला होता. भारताने लॉर्ड्सवर वेस्ट इंडिजविरुद्ध हा पराक्रम केला. त्यावेळी कपिल देव भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार होता. आता भारताच्या या ऐतिहासिक विजयावर चित्रपट बनवण्यात आला आहे. ज्याचे नाव ’83’ आहे.

या चित्रपटात लोकप्रिय अभिनेता रणवीर सिंग कपिल देवची भूमिका साकारत आहे. रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट कबीर खानने दिग्दर्शित केला आहे. 83 चित्रपटाच्या ट्रेलरला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. लोक हा चित्रपट पाहण्याची वाट पाहत आहेत.

चित्रपटातील सर्व स्टार्स आणि 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचे खेळाडू चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी चित्रपटाशी संबंधित रंजक माहितीही समोर येत आहे. अशा परिस्थितीत आता कपिल देवने चित्रपटासाठी किती रक्कम आकारली याचा खुलासा करण्यात आला आहे.

1983 च्या विश्वचषक संघातील खेळाडूंना 83 चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी 15 कोटी रुपये दिले असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे यातील ५ कोटी रुपये एकट्या कपिल देवच्या बॅगेत आले आहेत. वास्तविक, त्यावेळी कपिल देव संघाचा कर्णधार होता, आणि त्यामुळे त्याची भूमिकाही या चित्रपटात अधिक आहे. कपिल देवने त्याची कहाणी सांगण्यासाठी ५ कोटी रुपये घेतल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले जात आहे.

याविषयी माहिती देताना एका सूत्राने सांगितले आहे की, “चित्रपट बनवण्यापूर्वी विषयाचे अधिकार आणि खेळाडूंच्या वैयक्तिक कथा मिळवणे महत्त्वाचे आहे, विशेषतः जेव्हा तो वास्तविक जीवनातील घटनांमधून लोकांभोवती फिरतो. हे लक्षात घेऊन निर्मात्यांनी 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाला सुमारे 15 कोटी रुपये दिले. यामध्ये कपिल देवला सर्वाधिक रक्कम मिळाली.

रणवीर सिंग या चित्रपटात कपिल देवची भूमिका साकारत आहे, तर सुनील गावस्करच्या भूमिकेत ताहिर राज भसीन, यशपाल शर्माच्या भूमिकेत जतिन सरना, मोहिंदर अमरनाथच्या भूमिकेत साकिब सलीम, रवी शास्त्रीच्या भूमिकेत धैर्य करवा, के श्रीकांतच्या भूमिकेत जिवा, मदन लालच्या भूमिकेत हार्डी संधू, बलविंदर सिंगच्या भूमिकेत एमी विर्क, सय्यद किरमाणीच्या भूमिकेत साहिल खट्टर, संदीप पाटीलच्या भूमिकेत चिराग पाटील, दिलीप वेंगसरकरच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे, कीर्ती आझादच्या भूमिकेत दिनकर शर्मा, रॉजर बिन्नीच्या भूमिकेत निशांत दह्या भूमिका साकारत आहेत,

या चित्रपटात रणवीर सिंगची पत्नी आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण देखील दिसणार आहेत. खरंतर, ती या चित्रपटात कपिल देवची पत्नी रोमी भाटियाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. कोरोनामुळे अनेकवेळा चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली असली तरी आता हा चित्रपट २४ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे.या चित्रपटाच्या ट्रेलरला चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. दुबईतील जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा येथे नुकताच चित्रपटाचा ट्रेलरही दाखवण्यात आला. त्याच वेळी, रेड सी फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाचा प्रीमियर झाला.

admin